शंभु घरगुती मसालेचे थाटामाटात उद्घाटन संपन्न 

Google search engine

कर्जत येथे तनपुरे फॉर्म येथे तनपुरे परिवाराच्या वतीने शंभु मसालेचे थाटामाटात उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत व उपजिल्हाधिकारी तथा खाजगी सचिव मंत्री अन्न व औषध प्रशासन, मुंबई , रवींद्र पवार साहेब यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

यावेळी उद्घाटन प्रसंगी रवींद्र पवार साहेब बोलताना म्हणाले की ,आंतरराष्ट्रीय पातळीवर मार्केट काय आहे , भारताची स्टँडर्ड काय आहेत , आपण जे काही मसाले आणि मसाल्याचे पदार्थ आहेत , ते आंतरराष्ट्रीय पातळीवर कुठल्या लेव्हलला आहेत , आपण चीन ला निर्यात करतो , त्यानंतर युनायटेड किंग्डम ला निर्यात करतो , अमेरिकेला निर्यात करतो . त्यामुळे ओरिजनल खाद्य पदार्थ खाल्ले पाहिजेत . तसेच सेंद्रिय भाजीपाला खाल्ला पाहिजे . यावेळी शंभू ब्रँड चे कौतुक करताना ते म्हणाले की, शंभू ब्रँड कोणतीही भेसळ करत नाही,यावेळी ते बोलताना म्हणाले की, श्रावण महिना सुरू असून या उद्योगाचे नावही शंभू मसाले असून या निमित्ताने तनपुरे परिवाराला त्यांच्या या नवीन उपक्रमासाठी शुभेच्छा देतो असे उपजिल्हाधिकारी पवार म्हणाले .

यावेळी भाजपचे नेते प्रवीण घुले म्हणाले की , शंभू घरगुती मसाले हे आपल्या शरीरावर कुठल्याही प्रकारचा दुष्परिणाम होणार नाही अशा प्रकारचे मसाले बाजारात आणण्याचे काम शंभू मसाले यांच्या माध्यमातून घडत आहे .या निमित्ताने नवीन व्यवसायाची सुरुवात करताना उपजिल्हाधिकारी रवींद्र जी पवार उपस्थित राहिले .तसेच सर्व तनपुरे परिवाराच्या माध्यमातून अनेक वर्षापूर्वी किराणा दुकानाच्या माध्यमातून या कर्जत शहरामध्ये सुरुवात केली . तनपुरे कुटुंब हे स्वाभिमानी कर्तुत्ववान माणसे अनेक क्षेत्रांमध्ये पाऊल टाकून त्या क्षेत्रात शिखर गाठण्याचे काम तनपुरे परिवाराने केले आहे.यावेळी डॉ. राम तोरडमल, नगराध्यक्षा उषा राऊत यांची भाषणे झाली . यावेळी कुंती पवार, प्रवीण दादा घुले , बाळासाहेब साळुंखे, सुनील बाप्पा मोरे , अध्यक्ष संभाजी ब्रिगेड,महाराष्ट्र नगरसेविका छाया शेलार, अश्विनी दळवी, हर्षदा काळदाते आदी उपस्थित होते.