नवनाथ केंदळे सरांना राज्यस्तरीय महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

Google search engine

 

नवनाथ केंदळे सरांना राज्यस्तरीय महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे .यशवंत एज्युकेशन सोसायटीची प्राथमिक शाळा कर्जत या ठिकाणी ते कार्यरत आहेत.शिवस्वराज्य बहुउद्देशीय संस्था, पुनगाव , महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सामाजिक,राजकीय कला व इतर क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेवून त्यांना आदर्श पुरस्कार जाहीर झाला आहे . रविवार ११ ऑगस्ट २०२४ रोजी देवगड येथे सकाळी १०:३० वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल यशवंत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री किरण पाटील सर , संस्थापक सचिव श्री शिवाजीराव लांगोरे काका तसेच श्री नंदकुमार लांगोरे साहेब सचिव यशवंत शिक्षण संस्था कर्जत यांनी त्यांचे अभिनंदन केले.