
शैक्षणिक वर्ष २०२३- २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या पी.एम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय परिक्षेत न्यू गुरूकुल इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी स्वयंम संतोष शेळके याची टाकळी ढोकेश्वर येथे इ. ९ वी साठी निवड झाली आहे . शाळेच्या विद्यार्थ्यांनी संपादन केलेले भव्य यश हे विद्यार्थ्यांबरोबर पालक आणि शिक्षकांचे मनोधैर्य वाढविणारे आहे. त्यामुळे शाळेचा निश्चित विकास घडून आला आहे. विद्यार्थ्यांनी चांगले यश संपादन करून शाळेचे नाव उंचावले आहे. न्यू गुरूकुल इंग्लिश स्कूल ही स्पर्धा परिक्षेत उतुंग यश मिळवून देणारी एकमेव कर्जत तालुक्यातील शाळा आहे. विद्यार्थ्यांना सर्व स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन शिक्षक करतात आणि त्यांच्या उत्कृष्ट यशासाठी अविरत प्रयत्न करून मार्गदर्शन केले जाते.
या यशस्वी विद्यार्थ्याचे आणि त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे अभिनंदन,संस्थेचे मार्गदर्शक श्री. संभाजी लांगोरे साहेब (अतिरिक्त कार्यकारी अधिकारी, जि. प. अहमदनगर) , श्री. किरणजी नाईक (समन्वयक ) , श्री .शिवाजी पाटील (मुख्याध्यापक), राजेंद्रकुमार काळे (पर्यवेक्षक) आणि सर्व शिक्षकवृंद यांनी केले आणि त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.






