
दादा पाटील महाविद्यालय कर्जत येथील भौतिकशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. महेश भदाणे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे अत्यंत प्रतिष्ठित मानली जाणारी ‘ए्स्पायर रिसर्च मेन्टरशिप ग्रॅण्ट’ रुपये एक लाख नव्वद हजार रुपये संशोधनासाठी मंजूर करण्यात आली आहे. ‘ए्स्पायर रिसर्च मेन्टरशिप ग्रॅण्ट’ ही विद्यापीठातील तरुण संशोधन प्रतिभा ओळखण्यासाठी महत्त्वाची अशी निधी योजना आहे.
डॉ. भदाणे यांच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्र फाळके, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आमदार रोहितदादा पवार, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अंबादास पिसाळ, महाविद्यालय विकास समिती सदस्य बप्पाजी धांडे, राजेंद्र निंबाळकर, प्राचार्य डॉ. संजय नगरकर, भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. संजय ठुबे, महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक यांनी अभिनंदन केले







