कर्जत जामखेड मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे विधानसभेचे उमेदवार व आमदार रोहितदादा पवार हेच राहणार :- प्रा .तात्या सुद्रिक

Google search engine

 

गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कर्जत जामखेड मतदार संघात परिवर्तन घडवत आ.रोहित पवार मोठ्या मत्ताधिक्क्यांनी निवडून आले व त्यांनी कर्जत जामखेड मतदार संघाची वेगळी ओळख निर्माण केली. आ.रोहित पवार हेच विधान सभेचे उमेदवार असून ते मोठ्या मताधिक्यांनी यावेळी निवडून येतील यात कोणतीही शंका नसल्याचा निर्वाळा प्रा. तात्या सूद्रीक यांनी केला.

आ.रोहित पवार हे महविकास आघाडीचे प्रमुख नेते असून त्यांचावर आघाडीच्या अनेक नेत्यांच्या प्रचारांची जबाबदारी असणार आहे.

गेल्या निवडणुकीत आ.रोहित दादा पवार हे जायंट किलर ठरले .त्यांनी कर्जत जामखेड सारख्या मतदारसंघाची निवड करत तत्कालीन कॅबिनेटमंत्र्यांचा पराभव केला.त्यानंतर या मतदार संघात त्यांनी विकास कामांचा धडाका लावला. अनेक वर्षापासूनची प्रश्न निकाली काढले.सरकार गेल्यानंतर त्यांनी संघर्षाची भूमिका घेत ईडी , व इतर दबावतंत्रापुढे न झुकता लढाऊ वृत्ती जपत स्वाभिमानी बाणा जपला. पक्ष फुटल्यानंतर त्यांनी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी निष्ठा न बदलता शरदचंद्र पवार यांच्या बरोबर राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यांनी १९००० मुलांना सायकल वाटपमुळे अनेक मुले शिक्षण प्रवाहात आली, शेतकरी सहल , त्यातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले. स्मार्ट योजने अंतर्गत १३ शेतकरी कंपनी ५० कोटी अनुदान , रस्ते

महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार , दादा पाटील महाविद्यालयासाठी ९ कोटींचे सभागृह , दादा पाटील महाविद्यालय राष्ट्रीय लेव्हलचे कुस्ती स्पर्धा देशातील २००० मुलींचा सहभाग, मुलींसाठी तेजस्विनी बस , यामुळे अनेक मुली शिक्षणाच्या प्रवाहात आल्या. व इतर अनेक विकास असा सर्वसामान्य लोकांशी नाळ जोडणारे युवा व्यक्तिमत्व आ.रोहित पवार हेच २०२४ चे कर्जत जामखेड चे विधानसभेचे आमदार असतील

राज्यात महविकास आघाडी चे सरकार येणार असून कर्जत एमआयडीसी जानेवारी मध्येच होणार असून येथील रोजगाराचा प्रश्न सुटणार आहे आणि येथील युवकांना आ . रोहीतदादांबद्दल प्रंचड विश्वास आहेअशी प्रतिक्रिया यावेळी प्रा.तात्या सूद्रीक यांनी दिली .