साईकृपा कृषि महाविद्यालय व साईकृपा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट घारगाव येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

Google search engine

 

श्री. दत्तकृपा शैक्षणिक व कृषि ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित साईकृपा कृषि महाविद्यालय व साईकृपा इन्स्टिटूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट,घारगाव येथे आज गुरुपोर्णिमा निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सरस्वती च्या प्रतिमा पूजना नंतर आपल्या गुरूबद्दल कृतज्ञाता व्यक्त करण्यात आली. या वेळी साईकृपा कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. निंबाळकर सर तसेच साईकृपा इन्स्टिटूट ऑफ मॅनेजमेंट, घारगाव चे डायरेक्टर डाॅ. निंभोरे सर तसेच सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी साईकृपा कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. निंबाळकर सर यांनी आपल्या मनोगतामध्ये आपल्या जीवनाला घडवण्यात, नीतिमत्तेच्या मार्गावर मार्गदर्शन करण्यात गुरूंचा मोलाचा वाटा असतो. मग हे गुरु आई वडिल, शिक्षक असो किंवा तुमचे बहिण भाऊ. खरतरं प्रत्येकाकडून काही ना काहीतर शिकण्यासारखं असतं. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न व गुरूवर श्रद्धा ठेवण्याचे आवाहन विद्यार्थांना केले.

या कार्यक्रमाचे आयोजनासाठी श्री दत्तकृपा शैक्षणिक व कृषि ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. दत्तात्रय पानसरे साहेब व सचिव अर्चनाताई पानसरे मॅडम यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले.