पिंपळवाडी ग्रामपंचायत च्या कारभाराविरोधात विविध मागण्यांसाठी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन उपोषणाचा इशारा

Google search engine

 

पिंपळवाडी येथे स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक करून ग्रामसभा घेवून सदर ग्रामसभेमध्ये जानेवारी २०२१ पासून आजपर्यंत झालेल्या ग्रामपंचायत पिंपळवाडी चे सर्व खर्चाचे व कॅश बुकचे वाचन करण्यात यावे. व ग्रामसभेचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात यावे.तसेच १५ व्या वित्त आयोगातून झालेल्या कामांची व ग्रामनिधीच्या व्यवहाराची चौकशी करण्यात यावी.तसेच ग्रामपंचायतचे ऑडिट करण्यात यावे.तसेच ग्रामसेवकांची तातडीने बदली करण्यात यावी.या मागण्या मान्य न झाल्यास १ ऑगस्ट पासून पंचायत समिती , कर्जत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल , असे निवेदन गटविकास अधिकारी,कर्जत यांना देण्यात आले आहे.निवेदनावर भाऊसाहेब जंजिरे ,सुरेश पोटरे , अप्पा जंजिरे यांच्या सह्या आहेत.