
अनुदानित आश्रमशाळा सेवक सहकारी पतसंस्था मर्या. नारायणगाव (ता. जुन्नर, जि. पुणे) येथील निवडणुकीत रवींद्र गहिनीनाथ काकडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीत सर्व संचालक पदांसाठी बिनविरोध निवड झाली असून, नव्याने कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे.
संस्थेच्या अध्यक्षपदी शेळके चंद्रकांत पुनाजी (कोळवाडी), उपाध्यक्षपदी थोरात उज्चला तुकाराम (माळेगाव), सचिवपदी नवले विजय सर्जेराव (चावंड) तर खजिनदारपदी घोलप अविनाश खंडू (फुलवडे) यांची निवड करण्यात आली.
सदस्य म्हणून नाईकवाडी भरत भागुजी (आलमे), लोहकरे विजय मारुती (फुलवडे), हांडे संजय श्रीपत (कामशेत), भालेघरे विकास कृष्णा (माळेगाव), गायकवाड संतोष रामकिशन (तळेरान), फल्ले प्रशांत सोमनाथ (ओतूर), जोशी दत्तात्रय सोनू (तळेरान), ऐनोर भाऊसाहेब पांडुरंग (चावंड), पाठक प्रेमकला वैभव (कामशेत), काकडे रविंद्र गहिनीनाथ (आलमे), डोळे महादेव नारायण (कोळवाडी) यांची निवड झाली आहे.
ही निवडणूक निर्णय अधिकारी एस. बी. भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी निलेश धोंगडे व माळवे यांनी यशस्वीपणे पार पाडली.
नवीन कार्यकारिणीची निवड बिनविरोध झाल्याबद्दल सर्व सदस्य, संचालक, अध्यक्ष व सभासदबंधु यांचे आभार मानत रवींद्र काकडे यांनी सर्वांना सहकार्याचे आश्वासन दिले.






