कर्जत तालुक्यातील सिद्धटेक वडार वस्ती शिवारातील गायरान क्षेत्रात जुगार अड्डा जोरात सुरू , कारवाई करण्याची स्थानिकांची मागणी

Google search engine

 

कर्जत तालुक्यातील सिद्धटेक वडार वस्ती शिवारातील गायरान क्षेत्रात जुगार अड्डा जोरात सुरू आहे. या जुगार अड्ड्यावर कारवाई करणार कोण, असा सवाल आहे.

कर्जत तालुक्याच्या हद्दीत हा अड्डा सुरू असून स्थानिकांचा विरोध असला तरी  काहींचे जुगार अड्ड्याला लागेबांधे असल्याचे बोलले जात आहे. याबाबत पोलिसांनीच माहिती घेत कारवाई करावी, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.