सुनील गोरखे यांची आर.एस.पी. अधिकारी पदी सेवांतर्गत नियुक्ती

Google search engine

 

रयत शिक्षण संस्थेच्या अळसुंदे येथील न्यू इंग्लिश स्कूल या विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक सुनील अर्जुन गोरखे यांनी नुकतेच महाराष्ट्र राज्य गृह विभाग पोलीस व शिक्षण विभागाच्या अधिकारांतर्गत महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा व नागरी संरक्षण (आर एस पी ) अधिकारी प्रशिक्षण दिनांक 21 मे 2025 ते 30 मे 2025 या कालावधीत पोलीस मुख्यालय अहिल्यानगर येथे यशस्वीरित्या पूर्ण केले.

सदर प्रशिक्षणाअंतर्गत महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन, नागपूर यांच्या मार्गदर्शनानुसार पदकवायत, वाहतूक नियंत्रण, नागरी संरक्षण, अग्निशमन सेवा, प्रथमोपचार आणि आकस्मिक सेवा इत्यादी विषयाचे परिपूर्ण मार्गदर्शन प्राप्त केले.

महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार शिक्षकी पेशातील नोकरी करताना आर एस पी अधिकारी बनून खाकी वर्दी परिधान करण्याची संधी प्राप्त झाल्याचे समाधान आणि विद्यालयातील विद्यार्थ्यांना येत्या शैक्षणिक वर्षात शिस्त व अनुशासन यांचे धडे विशेष तासिकेअंतर्गत प्राप्त होणार असल्याचे विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास परहर यांनी सांगितले.

सदर प्रशिक्षणासाठी मुसा सय्यद, मोरे मेजर, दाभाडे मेजर, विभागीय समादेशक सिकंदर शेख, जिल्हा समादेशक बोंतले , उपजिल्हा समादेशक प्रकाश मिंड, कर्जत तालुका समादेशक अभिमन्यू बेरगळ,राखीव पोलीस निरीक्षक उमेश परदेशी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (भा. पो. से.) यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.

वयाच्या 53 व्या वर्षी विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी कठीण असणारे प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल स्थानिक सल्लागार समिती, शालेय व्यवस्थापन व विकास समिती, माता पालक संघ, पालक शिक्षक संघ, सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य अळसुंदे, सर्व शिक्षण प्रेमी नागरिक, विद्यालयातील शिक्षक रवींद्र विधाते, प्रवीण कांबळे तसेच सुरेश कुमार देशमुख व नितीन जगताप आणि विद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी सुनील अर्जुन गोरखे सर यांचे विशेष अभिनंदन केले.