
कर्जत तालुक्याच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर नेहमीच चर्चेत असलेल्या थेरगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी सामाजिक कार्यकर्ते अशोक भाऊ सकट यांच्या पत्नी सौ रुक्मिणी अशोक भाऊ सकट यांची बिनविरोध निवड झाली.
सर्वसमावेशक विकास, सहकार्य आणि विश्वास यांचा आधार घेत थेरगाव ग्रामपंचायत ने पंचक्रोशीत आपला नवा आदर्श स्थापन केला आहे. आणि या कार्यात अशोक भाऊ सकट यांचे मोलाचे स्थान आहे. उपसरपंच पदी रुक्मिणी अशोक भाऊ सकट यांची निवड करून त्यांच्या सामाजिक कार्याचा तसेच त्या ज्या अनुसूचित जाती या समाज घटकाचे प्रतिनिधित्व करतात त्या संपूर्ण बांधवांचा गौरव केल्याची भावना सर्वसामान्यानंच्या मनात निर्माण झाली.
उपसरपंच निवडीच्या बैठकीसाठी थेरगाव ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच अनिल साहेब शिंदे, वी. का. सेवा सोसायटीचे चेअरमन अनिल शिंदे सर, माहिती अधिकार कार्यकर्ते किरण जी शिंदे, आण्णासाहेब महारनवर, माजी सरपंच रवी साहेब महारनवर, रामा शिंदे, विठ्ठल नन्नावरे, पंडित दादा रायकर, उद्योजक शोभा शिंदे, बाळासाहेब जोगदंड, गणेश जोगदंड, गौतम जोगदंड, चंद्रकांत महारणवर, येडू आणा जाधव, आदी मान्यवर तसेच मोठ्या संख्येने थेरगाव मधील नागरिक उपस्थित होते.निवडीबद्दल अशोक भाऊ सकट यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
सौजन्य – प्रो. अमोल रोहिदास सकट
एम.ए.बीएड







