डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जतचा दहावीचा निकाल 100 टक्के 

Google search engine

 

डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जतचा दहावीचा निकाल 100 टक्के लागला असून दरवर्षी प्रमाणे विद्यालयाने उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम राखली आहे.

यामध्ये प्रथम क्रमांक खाटमोडे सोहम हनुमंत 95.40% व इंगळे रुद्रांशा राम 95.40 % , द्वितीय क्रमांक मोमीन शिफा कय्युमपाशा 90.60 % , तृतीय क्रमांक नायकोडे अथर्व अविनाश 88.80 % यांनी मिळवत उत्कृष्ठ यश संपादन केले.तसेच गणित विषयामध्ये इंगळे रुद्रांशा राम व मोमीन शिफा कय्युमपाशा यांनी 100 गुण मिळवत महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळवला.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा .राजेंद्र तात्या फाळके , संस्थेचे सचिव श्री अडसूळ दामोदर दिनकर सर व सर्व विश्वस्त , प्राचार्या श्रीमती थोरात संगिता ,श्रीमती तोरडमल दिपाली , श्रीमती कोळगे योगिता , श्री जगताप बभ्रुवान , श्री पठाण अमजद , श्री चव्हाण सचिन , सर्व मार्गदर्शक शिक्षक यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .