जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भैरोबा सायकर वस्ती येथे मिशन आपुलकी अंतर्गत लोकसहभागातून निर्माण केलेल्या भोजनगृहाचे उद्घाटन उत्साहात संपन्न 

Google search engine

 

 

 

 

आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भैरोबा सायकर वस्ती केंद्र राशीन तालुका कर्जत येथे मिशन आपुलकी अंतर्गत लोकसहभागातून निर्माण केलेल्या भोजनगृहाचे उद्घाटन राशीन केंद्राचे केंद्रप्रमुख राजू राऊत साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष कोकाटे, गणेश सायकर, संतोष गदादे, सागर सायकर,सतीश सायकर, अविनाश सायकर, नितीन भोंग, दीपक धोंडे, संतोष सायकर,काळू सायकर, बापूसाहेब सायकर, ज्ञानदेव लाहोर,सुनील सायकर, पांडुरंग सायकर, मनोहर सायकर,शरद सायकर, राजू सायकर,गंगाधर नष्टे,समीर यादव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला हार अर्पण करून करण्यात आली व फित कापून भोजन गृहाचे उदघाटण करण्यात आले. मुलांच्या उंचीची बैठक व टेबल, आरोग्य व आहारविषयक बोलक्या भिंती लक्ष वेधून घेतात. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या शिक्षिका सुनंदा जगताप यांनी केले तर मुख्याध्यापक हनुमंत येवले यांनी लोकसहभागातून भोजनगृह कसे उभारले याची माहिती देऊन ग्रामस्थांच्या कायमच मिळणाऱ्या सहकार्यामुळे हे शक्य झाल्याचे सांगितले. या भोजनगृहात दररोज विद्यार्थ्यांना पोषण आहार वाटप करण्यात येणार असून आरामदायी पद्धतीने विद्यार्थ्यांना या ठिकाणी याचा आस्वाद घेता येणार असल्याचेही श्री येवले यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राजू राऊत यांनी बोलताना शिक्षक व ग्रामस्थांचे या अभिनव कामाबद्दल कौतुक केले. शिक्षकांची कल्पकता व ग्रामस्थांचे सहकार्य असले की अशी कामे पूर्ण होतात. तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र तयार केलेले हे पहिले भोजनगृह असावे असेही यावेळी राऊत साहेब म्हणाले. ग्रामस्थ्यांच्या वतीने गणेश सायकर यांनी मनोगत व्यक्त केले. शेवटी हनुमंत येवले यांनी आभार व्यक्त केले. सर्व विद्यार्थ्यांना व उपस्थितांना लापशी व भाताचे जेवण देण्यात आले.