खंडाळा गोयकरवाडी ग्रामपंचायत सरपंचपदी सौ . साधना विलास गोयकर यांची बिनविरोध निवड

Google search engine

 

खंडाळा गोयकरवाडी ग्रामपंचायत सरपंच पदी सौ . साधना विलास गोयकर यांची आज बिनविरोध निवड झाली. सौ.किसनाबाई बनाजी खंडेकर यांनी राजीनामा दिल्याने ही निवड प्रक्रिया ग्रामपंचायत कार्यालयात आज पार पडली.

यावेळी सभेला संगीता बिभीषण महारनवर , आकाराम नवनाथ माने, जनाबाई रंगनाथ थोरात , किसनाबाई बनाजी खंडेकर , आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

अभ्यासी अधिकारी म्हणून श्री.शेळके बी.के. यांनी काम पाहिले. ग्रामपंचायत अधिकारी बरबडे. ए. एस.यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना नवनियुक्त सरपंच सौ.साधना विकास गोयकर म्हणाल्या , येणाऱ्या काळात सर्व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन गावाचा सर्वसमावेशक विकास करणार आहोत.

निवडीबद्दल नवनिर्वाचित सरपंच सौ.साधना विलास गोयकर यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.