सद्गुरु कृषी महाविद्यालयात अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा समारंभ

Google search engine

 

 

 

येथील संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित सद्गुरु कृषी महाविद्यालयात बीएससी ऍग्री शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. शैक्षणिक वर्ष २०२१ मध्ये महाविद्यालयामध्ये प्रवेश घेऊन चार वर्षाचा डिग्री चा अभ्यासक्रम पूर्ण करून विद्यार्थी महाविद्यालयातून बाहेर पडत आहेत. या डिग्री नंतर त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा देता येतात त्याचबरोबर पदव्युत्तर पदवीचे शिक्षण सुद्धा पूर्ण करता येते. अशा त्यांच्या जीवनातील नवीन वाटचालीसाठी महाविद्यालयांकडून शुभेछा समारंभ आयोजित करून त्यांच्या भावी वाटचालीला शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्रद्धा राहींज (अन्नसुरक्षा अधिकारी), वैभव सालवन (ए.एफ.ओ पंजाब नॅशनल बँक) सायली शेलार (महसूल सहायक) यांनी विद्यार्थ्यांना आपले स्वतःचे अनुभव कथन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जीवनात यश मिळवायचं असेल तर स्वतःचा स्वतःवर विश्वास असला पाहिजे व कष्ट केले पाहिजे असे मार्गदर्शन मान्यवरांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शंकरराव नेवसे होते. तसेच या कार्यक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्षा कल्याणीताई नेवसे , संस्थेचे सचिव राजेंद्रजी गोरे, खजिनदार अर्चनाताई गोरे, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी सखाराम राजळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामदास बिटे सर आदी मान्यवर उपस्थित होते. त्याचबरोबर महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. गेल्या चार वर्षात त्यांनी केलेले अध्ययन, त्यांना आलेले अनुभव या सर्व आठवणींना विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनोगतातून उजाळा दिला. महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना त्यांच्या पूर्ण बॅचचा फोटो आठवण म्हणून भेट देण्यात आला. आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये संस्थेचे संस्थापक डॉ.शंकरराव नेवसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या भाषणातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांची असलेली तळमळ व्यक्त होत होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामदास बिटे सर यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाचे सर्व आयोजन नियोजन तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी केले होते. कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शन प्रा.चांगदेव माने यांनी केले व अल्पोपहार देऊन समारोप करण्यात आला.