कापरेवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीत भैरवनाथ शेतकरी विकास पॅनेलचे घवघवीत यश  , १२-१ ने पॅनेल विजयी 

Google search engine

 

 

कापरेवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित कापरेवाडी संचालक मंडळ निवडणुकीत लोकनियुक्त सरपंच अनिल साहेब खराडे यांच्या अध्यक्षतेखाली भैरवनाथ शेतकरी विकास पॅनेलने 12-1 असे घवघवीत यश मिळवले . या निवडणुकीत चार संचालक बिनविरोध निवडले आहेत .आज झालेल्या मतदानात 232 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 221 मते वैध झाली . तर 11 अवैध मते आज मतमोजणी नंतर पॅनेलचा संचालक निवडीत प्रचंड बहुमतांनी विजयी झाला .

यावेळी विजयी सभेत बोलताना लोकनियुक्त सरपंच अनिल साहेब खराडे म्हणाले , मतदारांनी दिलेल्या विश्वासास पात्र राहून येणाऱ्या काळात कापरेवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकरी केंद्र बिंदू मानून काम करणार आहोत.