
औटेवाडी येथे लोकवर्गणीतून उभारण्यात आलेल्या शिवस्मारकाच्या तटबंदी बुरुजांत आता सुबक आणि सुंदर पितळी ‘राजमुद्रा’ विराजमान होणार आहे. त्यामुळे या शिवस्मारकाच्या सौंदर्यात भर पडणार असून, हे शिवस्मारक शिवभक्तांसाठी आकर्षण ठरणार आहे. पुणे येथील उद्योजक विक्रम नलवडे यांनी ही अनोखी भेट दिली आहे. काही महिन्यांपूर्वी येथील शिवप्रेमींनी एकत्र येत शिवस्मारकाचे काम हाती घेतले होते. सर्वांच्या सहकार्यातून अखेर हे काम आता अंतिम टप्प्यात आहे. या शिवस्मारकापुढेच पन्नास फुटांपेक्षा अधिक उंचीचा स्वराज्य ध्वजही उभारण्यात आला आहे. येथील परिसरात वेगवेगळ्या प्रकारची रंगीबेरंगी फुलझाडे लावण्यात आली आहेत. बसण्यासाठी बाके टाकण्यात आली आहेत. लवकरच शिवमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार असल्याची माहिती येथील शिवभक्त राहुल कापसे,सचिन कापसे,तानाजी कापसे, सुरज ढवाण यांनी दिली.







