हॉटेल उपसरपंच गुळाचा चहा मांदळी शाखेचे आज उद्घाटन

Google search engine

 

हॉटेल उपसरपंच गुळाचा चहा मांदळी शाखेचे आज उद्घाटन संपन्न होणार असल्याची माहिती संचालक घनशाम बबन गांगर्डे यांनी दिली .आज रविवार सायंकाळी 06.00 वाजता नगर सोलापूर रोड , मांदळी ता.कर्जत येथे श्रीगोंद्याचे सुप्रसिद्ध उपसरपंच गुळाचा चहा शाखा नंबर 1059 संस्थापक मिलिंद शेठ भोईटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

श्रीगोंद्याचे सुप्रसिद्ध उपसरपंच गुळाचा चहा हा ब्रँड सध्या तेजीत दिसत आहे. या चहाची सर्वच महाराष्ट्रामध्ये चलती आहे. गुळाचा चहा मोठ्या प्रमाणात प्रकाश झोतात आला आहे. जुन्याकाळी लोक गुळाचा चहाच घेत असंत. गुळाचा चहा प्रसिध्दीत आल्याने तरुणांसह सर्वच वर्गात याची क्रेझ आहे.

कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन निमंत्रक घनशाम गांगर्डे यांनी केले आहे.