
कर्जत तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या थेरगाव गावात नवा राजकीय पटर्न दिसून आला असून एक भाऊ ग्रामपंचायत सरपंच व एक भाऊ सोसायटी चेअरमन असा दुग्धशर्करा योग जुळून आला आहे.
अनिल नानाभाऊ शिंदे साहेब हे सरपंच तर अनिल अंबादास शिंदे सर हे सोसायटी चेअरमन आहेत.आमदार रोहित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गावात विकास करण्यांचा निर्धार या दोन्ही बंधूंनी घेतला या दोघांनाही या पदापर्यंत घेवुन जाण्यासाठी मार्गदर्शक महत्त्वाच्या भूमिका बजावल्या ते म्हणजे चंद्रकांत महारनवर , शोभाचंद शिंदे , राजुशेठ शिंदे , पंडित रायकर , गोरख आण्णा , मिनीनाथ शिंदे संभाजी बेद्रे , बंटी धुमाळ , विजय शेठ शिंदे, कैलास साहेब काळे या सर्वांनी युवकांना खुप मोठी संधी उपलब्ध करून दिली.
सरपंच अनिल नानाभाऊ शिंदे साहेब हे सर्व ग्रामस्थांना बरोबर घेवून गावाचा सर्वसमावेशक विकास करत आहेत. तर अनिल अंबादास शिंदे सर हे सोसायटी चेअरमन असून ते शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची सोसायटीच्या माध्यमातून सोडवणूक करत आहेत. हे दोन्ही बंधू गावचा कायापालट करण्यासाठी नेहमी तत्पर दिसून येतात. सर्वांच्या सुख दुःखाची जान असलेले हे बंधू येणाऱ्या काळात थेरगावचा नक्कीच सर्वांगीण कायापालट करतील .







