
टाकळी खंडेश्वरी उपसरपंच पदी आज श्रीमती रोहिणी आबासाहेब फरताडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सभेला फैमिदा युसुफ सय्यद , काकासाहेब विश्वनाथ सकट, श्री अमोल शिवाजी पाटील, श्रीमती मंगल गोरक्षनाथ भालेराव श्री.सागरकुमार गिराजबापु ढोबे व श्रीमती रोहिणी आबासाहेब फरताडे आदी उपस्थित होते.
निवडणूक अभ्यासी अधिकारी म्हणून सरपंच श्रीम मंगल गोरक्षनाथ भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली.याचबरोबर ग्रामपंचायत अधिकारी अमित मच्छिद्र कोल्हे यांनी सचिव म्हणुन काम पाहिले.
यावेळी बोलताना श्रीमती.रोहिणी आबासाहेब फरताडे म्हणल्या , येणाऱ्या काळात गावाचा सर्वसमावेशक विकास करणार असून सर्व ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाने मूलभूत गरजा व इतर सर्व सुविधा आदी बाबींवर काम करणार आहे.
निवडीबद्दल नूतन उपसरपंच सौ.रोहिणी आबासाहेब फरताडे यांचे श्री.किरण पाटील माजी उपसभापती पंचायत समिती कर्जत, व ग्रामस्थांनी शुभेच्छा देवून अभिनंदन केले.







