उद्योजिका सौ. सुवर्णा रविंद्र बरबडे यांना ‘राजमाता जिजाऊ गौरव पुरस्कार’ प्रदान

Google search engine

 

उद्योजिका सौ. सुवर्णा रविंद्र बरबडे यांना त्यांच्या उत्कृष्ट उद्योजकतेबद्दल ‘राजमाता जिजाऊ गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. जिजाऊ सेवा संघ आणि अखिल भारतीय मराठा संघ पर्व 4 थे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन 11 मार्च 2025 रोजी राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन , सहयोग सोसायटी समोर , दूध संघ वसाहत , भिगवन रोड , बारामती येथे करण्यात आले होते. सौ. शर्मिलावहिनी पवार आणि सुनंदाताई पवार यांच्या हस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.

सौ. सुवर्णा बरबडे या मूळच्या कर्जत तालुक्यातील राशीन येथील असून, त्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे आल्या आहेत.

बारामतीत मुलांच्या शिक्षणासाठी त्या स्थलांतरित झाल्या. मुलांच्या शिक्षणासाबरोबरच त्यांनी कापड व्यवसायात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. आपल्या कष्ट, धाडस आणि व्यावसायिक कौशल्याच्या जोरावर त्यांनी कापड उद्योगात नावलौकिक मिळवला आहे.

त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना ‘राजमाता जिजाऊ गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.या सन्मानामुळे राशीनसह संपूर्ण कर्जत तालुक्यात आनंदाचे वातावरण असून, स्थानिक स्तरावर त्यांचे कौतुक केले जात आहे. महिला उद्योजकांना प्रेरणा देणाऱ्या त्यांच्या या कार्याची मोठी दखल घेतली जात असून, ग्रामीण भागातील महिलाही व्यवसाय क्षेत्रात यश मिळवू शकतात, हे त्यांनी आपल्या उदाहरणातून दाखवून दिले आहे.