
गणेश पशुखाद्य उद्योग समूहाचे सर्वेसर्वा तथा युवा उद्योजक केशव घोडके यांच्या पुढाकारातून व हिंदुस्थान कॅटल फीड्सच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माहीजळगाव येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी हिंदुस्तान कॅटल फीडचे अधिकारी विश्वजीत जगताप, विनायक बागल, प्रतीक निंबोरे ,गणेश पशुखाद्य उद्योग समूहाचे मालक केशव घोडके शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष लक्ष्मण शेटे, पत्रकार ग्रामपंचायत सदस्य दादा शिंदे, स्वप्निल टकले, मुख्याध्यापक विलास सोमवंशी, सहशिक्षिका कालिका क्षीरसागर, स्वाती जाधव, अनिता राठोड हे उपस्थित होते.
दूध वाढीसाठी शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन मेळावे , दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या माहितीपर कार्यशाळा, विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप असे अनेक सामाजिक उपक्रम युवा उद्योजक केशव घोडके यांच्या माध्यमातून घेतले जातात.
यावर्षी हिंदुस्तान कॅटल फिड्सच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळा माही व जळगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील 200 विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले. यापुढेही अनेक सर्वांच्या सहकार्याने सामाजिक उपक्रम राबवणार असल्याचे यावेळी बोलताना केशव घोडके म्हणाले.
प्रास्ताविक विलास सोमवंशी सर यांनी केले तर आभार स्वाती जाधव मॅडम यांनी मानले .







