
रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयातील पाच विद्यार्थी बॅरिस्टर डॉ. पी .जी. पाटील व सौ. सुमतिबाई पाटील फेलोशिपचे मानकरी ठरलेले आहेत. महाविद्यालयात शिकणाऱ्या वेगवेगळ्या वर्गातील उच्च शिक्षण घेत असलेल्या आणि सर्वोच्च गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांना ही फेलोशिप दिली जाते. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ यावर्षी महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांना मिळालेली होती. यावर्षी महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांना बॅरिस्टर डॉ. पी .जी. पाटील व सौ. सुमतिबाई पाटील फेलोशिप प्राप्त झाली आहे.
या फेलोशिपचा धनादेश महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्या हस्ते फेलोशिप प्राप्त विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आला.
फेलोशिप प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये प्राजक्ता संदीप भंडारी (एस.वाय.बी.ए-८२.५०%), हर्षदा विनोद नरसाळे (टी.वाय.बी.ए- ८०.४०%), भांडवलकर अनिकेत दत्तात्रय (टी.वाय.बी.ए-७८.९७%), आदित्य दादासाहेब सुरवसे (टी.वाय.बी.ए-६६.९०%), काजी सदक हारूण (एफ.वाय.बी.ए-८२.८५ या विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळालेली आहे.
याप्रसंगी कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. प्रमोद परदेशी, इंग्रजी विभागाचे विभागप्रमुख डॉ. आनंद हिप्परकर, स्पर्धा परीक्षा समन्वयक प्रा. संदीप गोंदके, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. दत्तात्रय शेंडे, डॉ. अंगद भोंडवे, प्रा. ढोले हे उपस्थित होते.







