
रयत शिक्षण संस्थेचे, दादा पाटील महाविद्यालय, कर्जत येथील सी ट्रिपल आय व सायन्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिनाचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले होते. या दिनाचे औचित्य साधून विविध उपक्रम याप्रसंगी महाविद्यालयात राबविण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने ऑनलाइन क्विझ, पोस्टर प्रेझेंटेशन घेण्यात आले. यशिवाय ‘परमाणु’ हा चित्रपट महाविद्यालयाच्या शारदाबाई सभागृहात दाखविण्यात आला. या सर्व उपक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला.
या विज्ञान दिन उपक्रमाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. संजय ठुबे यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संजय नगरकर होते. आभार डॉ. संगीता कुलकर्णी यांनी मानले.
महाविद्यालयाच्या डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम हॉलमध्ये ‘पेटंट्स नोंदणी प्रक्रिया’ या विषयावरील कार्यशाळेमध्ये डॉ. सुमित चौधरी, असिस्टंट कंट्रोलर ऑफ पेटंट्स अँड डिझाईन पेटंट ऑफिस, मुंबई गव्हर्मेंट ऑफ इंडिया, यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संजय नगरकर होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संदीप पै यांनी, प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. आशा कदम यांनी तर कार्यक्रमाचे आभार डॉ. अशोक मस्के यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. संतोष क्षीरसागर, डॉ. महेश भदाणे, प्रा. बलभीम महानवर, प्रा. अक्षय शिंदे, डॉ. प्रितेश गुगळे, डॉ. अशोक पिसे, डॉ. अजित इंगळे, प्रा. संदीप गोंदके, प्रा.गणेश सूर्यवंशी, प्रा. अमोल परदेशी यांचा हातभार लागला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रतिमा पवार व प्रा. राम काळे यांनी केले.







