
उपविभागीय अभियंता कार्यालय , राज्य महामार्ग 548D अहील्यानगर येथील कार्यालयासमोर वालवड ता.कर्जत येथील सरपंच केतन पांडूळे व उपसरपंच नानासाहेब औचर हे मौजे वालवड येथील मुख्य रस्त्यावर तात्काळ स्ट्रीट लाईट व स्पीड ब्रेकर बसवावेत व तसेच स्ट्रीट लाईट बसवण्यास ज्या अधिकाऱ्यांनी विलंब केला अशा अधिकाऱ्यांना तात्काळ सेवेतून निलंबन करण्याची मागणी सरपंच व उपसरपंच यांनी केली आहे.
यावेळी बोलताना सरपंच केतन पांडूळे म्हणाले ,
548D महामार्ग वरती वालवड ता.कर्जत हे मोठे गाव असून मुख्य रस्त्यावर संध्याकाळी छोटे मोठे अपघात नित्याचे झाले असून भरधाव वाहनांमुळे ग्रामस्थांना रात्री अपरात्री अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे त्यामुळे येथे तात्काळ स्ट्रीट लाईट व स्पीड ब्रेकर बसवावेत व तसेच स्ट्रीट लाईट बसवण्यास ज्या अधिकाऱ्यांनी विलंब केला अशा अधिकाऱ्यांना तात्काळ सेवेतून निलंबन करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली .







