श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या निमित्ताने अन्नदान, ज्ञानदान, श्रमदान ,रक्तदान अशा विविध सामुदायिक कार्यक्रमामध्ये माळंगी ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. दिनांक 20 फेब्रुवारी 2025 ते 27 फेब्रुवारी 2025 या कालावधीत वैकुंठवासी ह .भ .प .गोविंद महाराज केंद्रे यांच्या आशीर्वादाने व ह.भ.प गुरुवर्य भास्कर महाराज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ग्रामस्थांच्या बहुमोल सहकार्याने या सप्ताहाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते .
24 वर्षांपासून या सप्ताहाचे आयोजन मोठ्या उत्साहाने केले जाते. या निमित्ताने प्रवचन , हरिपाठ , कीर्तन , अन्नदान , सामुदायिक जागर , काकडा अशा विविध धार्मिक कार्यक्रमाने माळंगी दुमदुमल्याचे पाहावयास मिळाले तसेच पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. यानिमित्ताने रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे असा संकल्प करत 51 रक्तदात्यांनी महाशिवरात्रीनिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान केले . समस्त ग्रामस्थ माळंगी यांच्या अनमोल सहकार्यातून प्रेरणेतून या सर्व कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.







