
कर्जत तालुक्यातील वडगाव तनपुरा येथील महसूल खात्यात तलाठी ते मंडळ अधिकारी पदापर्यंत काम करत प्रामाणिकपणे सेवा करुन तालुक्यात लोकांच्या हृदयात “बापू” म्हणून स्थान मिळवणारे कै. हनुमंतराव शहाजी तनपुरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रित महाराष्ट्रातील नामांकित
ह.भ.प पुरुषोत्तम महाराज पाटील (बुलढाणा) यांच्या सुश्राव्य वाणीतून संगीतमय भागवत कथा सादर केली जाणार आहे कथा माला ५ मार्चपासून सुरू होऊन ८ मार्चपर्यंत दररोज सायंकाळी ०६ ते ०९ या वेळेत पार पडेल. त्याचबरोबर दररोज ९ ते १० महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन शहाजीराव तनपुरे फार्म नांदगाव रोड, वडगाव तनपुरा या ठिकाणी असणार आहे.
भागवत कथा कार्यक्रमासाठी मित्रमंडळी, ग्रामस्थांनी तसेच तालुक्यातील वारकरी संप्रदायातील सेवा करणाऱ्या सर्व भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महेश व नितीन तनपुरेंसह , नातेवाईक व पै. प्रविणदादा घुले पाटील मित्र मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.







