कर्जत पोलिस स्टेशन अंतर्गत नाकाबंदी करून दुचाकी वाहनांची तपासणी ,  ४७ वाहन चालंकाकडून ४२५०० रुपये दंड वसूल 

0
583
Google search engine

 

 

कर्जत पोलिस स्टेशन अंतर्गत महात्मा फुले चौक येथे 1 पोलिस अधिकारी 5 पोलिस अंमलदार 10 होमगार्ड यांचे समवेत सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत नाकाबंदी करून दुचाकी वाहनाची तपासणी करण्यात आली. त्यादरम्यान नंबर प्लेट नसलेले , कागदपत्रे नसलेले एकूण 59 वाहने डिटेन केली. त्यांची तपासणी व वाहनांची कागदपत्रांची खात्री करून 45 वाहने आता पर्यंत सोडण्यात आली असून इतर वाहनाची कागदपत्रांची तपासणी करणे सुरू आहे. उर्वरित वाहने पोलिस स्टेशन येथे डिटेन करण्यात आली आहेत. 47 वाहन चालंकावर दंड करण्यात आला असून 42500 रुपये दंड करण्यात आला आहे.त्यांचे कागदपत्रे खात्री करून पुढील कारवाई करण्यात येते आहे .