
कर्जत येथील रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयाची कुस्तीपट्टू व सुवर्णकन्या सोनाली मंडलिक हिने नुकत्याच संपन्न झालेल्या महिला ‘मंगळवेढा केसरी किताब’ स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावले आहे. सदर कुस्तीपट्टूला महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक व रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर डॉ. संतोष भुजबळ यांचे मार्गदर्शन लाभले.
केसरी किताब जिंकल्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्रतात्या फाळके, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आमदार रोहितदादा पवार, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अंबादासजी पिसाळ, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बप्पाजी धांडे, राजेंद्र निंबाळकर, माजी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी, प्राचार्य डॉ. संजय नगरकर, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. संतोष भुजबळ, प्रा. पवन कडू तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक यांच्यावतीने सुवर्णकन्या सोनाली मंडलिक या कुस्तीपट्टूचे अभिनंदन करण्यात आले.







