
ओबीसी नेते लक्ष्मण हाके उद्या बाजीबाबा प्रतिष्ठान , डोंबाळवाडी येथे बाजीबाबा उत्सवास उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजक पांडुरंग डोंबाळे , संस्थापक , बाजीबाबा प्रतिष्ठान, चेअरमन बाबासाहेब डोंबाळे यांनी दिली . बाजीबाबा प्रतिष्ठान तर्फे आयोजित बाजीबाबा उत्सवाचे हे 15 वे वर्ष असून दर वर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान उद्या संध्याकाळी 07.00 वाजता ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे उत्सवास भेट देणार आहेत. तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने ओबीसी बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक पांडुरंग डोंबाळे , संस्थापक , बाजीबाबा प्रतिष्ठान, चेअरमन बाबासाहेब डोंबाळे यांनी केले आहे. कार्यक्रमानंतर उद्योजक निलेश शेठ पारखे यांच्या तर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.







