
श्री दत्तकृपा शैक्षणिक व कृषि ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित व महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी संलग्न साईकृपा कृषि महाविद्यालय, घारगाव येथे आज दि.२८ नोव्हेंबर रोजी महात्मा फुले यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रथम वर्ष विद्यार्थीनी कु. श्वेता हाके हीने केले. यावेळी साईकृपा कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. निंबाळकर सर हे अध्यक्ष स्थानी होते. यावेळी प्रतिमेला अभिवादन करून विद्यार्थीनी फुले बद्दल मनोगत व्यक्त केले तसेच प्राध्यापक मनोगत मध्ये प्रा. पगार सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रा पाठक सर महात्मा ज्योतिबा फुलेंचे स्त्री शिक्षणाबद्दलचे कार्य व त्याची आजच्या काळातील महत्त्व स्पष्ट केले. अध्यक्षीय मनोगत मध्ये प्राचार्य डाॅ. निंबाळकर सर यांनी महात्मा फुलेंच्या शैक्षणिक व सामाजिक सुधारणांमुळे मिळालेल्या शैक्षणिक संधीचा गुणवत्ता वाढ करण्यासाठी सदुपयोग करण्याचे आवाहन केले. आभार प्रदर्शन पवण साळुंखे या विद्यार्थाने केले. यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी दत्तकृपा शैक्षणिक व कृषि ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा.श्री दत्तात्रय पानसरे साहेब, सचिव आदरणीय अर्चनाताई पानसरे मॅडम तसेच संस्थेचे रजिस्टार श्री कल्याण शिंदे सर व महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. निंबाळकर सर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.







