प्रा.विजय बबन जाधव यांना पीएचडी पदवी प्रदान 

0
103
Google search engine

 

श्रीगोंदा तालुक्यातील माठ येथील व संजीवनी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलिटेक्निक , कुरुंद येथे कार्यरत असणारे प्रा. विजय बबन जाधव यांना मेकॅनिकल इंजिनिअरिंग क्षेत्रातील पीएचडी मॅट्स युनिव्हर्सिटी, छत्तीसगड येथून नुकतीच पदवी प्रदान करण्यात आली.त्यांनी हॉट फोर्जिंग अँड  प्रोसेस डिफेक्ट वेस्ट कंट्रोल मेथड अँड डाय लाईफ इम्प्रूमेंट या विषयावर प्रबंध सादर केला होता .पीएचडी पदवी प्राप्त केल्याबद्दल प्रा.विजय जाधव सर यांचे संजीवनी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलिटेक्निकचे प्राचार्य एस .डी .कापसे सर आणि प्राचार्य शेटे सर , डॉ.बी.व्ही.अनारसे सर , दत्तकला इंजिनिअरिंग कॉलेज व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.