माही गावातून आ.रोहित दादांना लीड देवून आ.रोहीत दादांचा विजय सुकर केला : दिपक काकडे , माहीजळगाव चौकात कार्यकर्त्यांची जंगी विजयी मिरवणूक 

0
968
Google search engine

 

मतदार संघाचा विकासाचे पर्व अजुन पुढे नेण्याकामी स्वाभिमानी जनतेने आ .रोहीत दादा पवार यांना साथ दिल्याची प्रतिक्रिया दिपक काकडे यांनी दिली .रोहित पवार हेच सर्वसामान्य जनतेचे सरकार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. माही गावातून रोहित दादांना २०० मतांच मताधिक्य दिले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

आजतागायत पर्यंत सन २०१९ पर्यंत आपला मतदारा संघ हा भारतीय जनता पक्षाचा आमदार होता. तरीही मतदार संघात कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे लोकांनी आपल्या स्वयंघोषित भुमिपुत्राला बाजुला सारून रोहीत दादा पवार यांना दुसऱ्यांदा विकास करणेकामी संधी दिली, त्यानुसार रोहीत दादांनी विकासाकामी आवश्यक असलेल्या मतदार संघात अनेक पायाभुत सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. आज आपला मतदार संघ हा अनेक गोष्टीवर आघाडीवर जात असल्याने तो पुढे नेण्यास नक्कीस आपल्या विकासाला साथ कर्जत जामखेड मधील जनतेने दिली .रोहीत दादांनी सर्व उणिवा लक्षात घेवुन विकासाचे व्हीजन ठेवुन काम केले. कर्जत जामखेड मधील जनता , मतदार सुज्ञ आहे. त्यामुळे रोहीत दादांना दुसऱ्यांदा साथ देवुन आपल्या विकासाला साथ दिली.आपल्या तालुक्यांचा मतदार हा अत्यंत हुशार असुन त्यांनी विकासाला साथ दिली आणि रोहीत दादाला विजयी केले .