रोहित दादा पवार यांनी दोन्ही तालुक्यात कलाकारांना प्रदर्शनाची व्यापक व्यासपीठे उपलब्ध करून दिल्यामुळे मतदार संघातील कलाकार भक्कमपणे पाठीशी राहिल्याने आ.रोहीत दादांचा विजय झाला : गायक तुषार भगवान घोडके

0
245
Google search engine

रोहित दादा पवार यांनी दोन्ही तालुक्यात कलाकारांना प्रदर्शनाची व्यापक व्यासपीठे उपलब्ध करून दिली

 

आमदार रोहितदादा पवारांनी कर्जत जामखेड मतदार संघ कुटूंबा प्रमाणे जपला , विकास कोट्यवधी रुपयांच्या विकास कामामुळे आ.रोहीत दादा पवार यांना स्वाभिमानी जनतेने मतदान रुपी आशीर्वाद दिला. आ.रोहीत दादा पवार यांनी कला क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे.कर्जत-जामखेड दोन्ही तालुक्यात भरपूर कलाकार आहेत पण त्यांना संधी द्यायचा ऐवजी प्रा. शिंदे यांनी त्यांच्या स्वतःच्या वाढदिवसाला बाहेरच्या लोकांना संधी देत स्थानिक कलाकारांना वाऱ्यावर सोडण्याच काम केले. त्याच बरोबर कोरोनाच्या काळात कलाकारांवर उपासमारीची वेळ आली असताना, बगिच्यामध्ये पाणी मारणारे स्वतःला पाणीदार आमदार म्हणून घेणारे, यांनी कलाकारांच्या डोळ्यातले पाणी पुसले नाही, याउलट रोहित दादा पवार यांनी दोन्ही तालुक्यात कलाकारांना प्रदर्शनाची व्यापक व्यासपीठे उपलब्ध करून दिली.यामुळे दोन्ही तालुक्यातील कलाकारांना प्रोत्साहन मिळाले आणि त्यांच्या घरातल्या चुली पेटल्या. त्यामुळे दोन्ही तालुक्यातील कलाकार वर्ग हा रोहित दादांच्या पाठीशी भक्कम पणे उभा राहून त्यांना विजयी केले असे गायक तुषार भगवान घोडके यांचे मत आहे.