
कर्जत जामखेड विधानसभा निवडणुकीची उद्या दादा पाटील महाविद्यालय, कर्जत येथे मतमोजणी पार पडणार आहे. मतमोजणी पूर्वीच कर्जत शहरात आ .रोहीत दादा पवार यांचे कट्टर समर्थक ऋषिकेश धांडे यांनी कर्जत शहरात विजयाचा फ्लेक्स लावला असून आ .रोहीत दादा पवार यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कर्जत जामखेड मतदार संघातील लढत ही संपूर्ण महाराष्ट्रात लक्षवेधी ठरली असून शेवटच्या क्षणापर्यंत काँटे की टक्कर पहावयास मिळाली. उद्या २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असली तर निकालापूर्वीच कर्जत जामखेड मतदार संघात आ.रोहीत दादा पवार यांचे विजयाचे फ्लेक्स झळकले आहेत.
२० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान पार पडल्यानंतर मतदानाचा टक्का वाढल्याने नेमका धक्का कोणाला बसतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. अशातच आता चौकाचौकात कोण विजयी होणार कोण पराभूत होणार याच्या खमंग चर्चा रंगू लागल्या असून मोठ्या मोठ्या पैजा पडल्या आहेत . मतदान केंद्रनिहाय कोणाला किती मतदान होईल याची आकडेमोड जोरात सुरु आहे.
आपल्या उमेदवाराचा विजय निश्चित असल्याचे गृहीत धरुन कर्जत जामखेड मतदार संघात आ. रोहीत पवार यांच्या विजयाचे फ्लेक्स झळकले आहेत. निकालाअगोदरच फ्लेक्स झळकल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून विजयी कोण होणार हे उद्याच समजणार आहे.







