निकालापूर्वीच आ.रोहीत दादा पवार यांचे विजयाचे फ्लेक्स झळकले, कट्टर समर्थक विजू काका कटारे यांचा लोणी मसदपुर मध्ये झळकला फ्लेक्स

0
1164
Google search engine

 

कर्जत जामखेड विधानसभा निवडणुकीची उद्या मतमोजणी पार पडणार आहे. ही लढत लक्षवेधी ठरली असून शेवटच्या क्षणापर्यंत काँटे की टक्कर पहावयास मिळाली. उद्या २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असली तर निकालापूर्वीच कर्जत जामखेड मतदार संघात आ.रोहीत दादा पवार यांचे विजयाचे फ्लेक्स झळकले आहेत.

२० नोव्हेंबर मतदान पार पडल्यानंतर मतदानाचा टक्का वाढल्याने नेमका धक्का कोणाला बसतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. अशातच आता चौकाचौकात कोण विजयी होणार कोण पराभूत होणार याच्या खमंग चर्चा रंगू लागल्या आहेत. मतदान केंद्रनिहाय कोणाला किती मतदान होईल याची आकडेमोड जोरात सुरु आहे. अनेकांच्या पैजाही पडल्या आहेत.

आपल्या उमेदवाराचा विजय निश्चित असल्याचे गृहीत धरुन कर्जत जामखेड मतदार संघात आ. रोहीत पवार यांच्या विजयाचे फ्लेक्स झळकले आहेत. निकालाअगोदरच फ्लेक्स झळकल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत .