तुकाई उपसा जलसिंचनचे काम आ.राम शिंदेंनी सुरू केलंय तर खांडवी उपसा जलसिंचन योजनेचे काम आ. पवारांनी हाती घ्यावे ही अपेक्षा : प्रा.एन.एस.तापकीर 

0
191
Google search engine

 

कर्जत- जामखेड तालुक्यातील बहुतांश जनतेचा उदरनिर्वाह हा शेती आणि तत्सम उद्योगांवर अवलंबून आहे परंतू या तालुक्यातील कित्येक गावातील शेती आजही फक्त आणि फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. उन्हाळ्यात कित्येक भागात पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकर सुरू करावे लागतात मग शेतीच्या जलसिंचनाचा विषय तर खूप दूरचा आहे. येथील पाणीप्रश्न,शिक्षण, रोजगानिर्मिती हे मूलभूत प्रश्न आजही तसेच आहेत .

कर्जत -जामखेड तालुक्यातील, मिरजगाव जिल्हा परिषद गटातील अनेक गावातील पिण्याच्या पाण्याचा , शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रा.आ.शिंदेंनी तुकाई उपसाजल सिंचन योजना चालू केली आहे ,तरीही भोसे, चखालेवाडी, खांडवी, कोंभळी, कौडाणे, रवळगाव, नागमठण, कोकणगाव, मांदळी , नागमठाण,चिंचोली रमजान, थेरगाव, घुमरी , बेलगाव इत्यादी गावे या योजनेत सहभागी नाहीत यामुळे हा भाग पाण्यापासून वंचितच राहील, आशा पाण्यापसून वंचित राहिलेल्या गावांचा पिण्याचा, शेतीचा प्रश्न उन्हाळ्यात गंभीर बनतो अन् मग तात्पुरते उपाय केले जातात, असे तात्पुरते उपाय करण्याऐवजी खांडवी जल उपसा सिंचन योजनेच काम आ .पवार यांनी हाती घ्यावे. ओपन चारींच्या मार्फत किंवा बंदिस्त पाईपलाईनद्वारे ओढे, नाले,तळे भरून आसपासच्या परिसरातील राहिलेल्या गावांचा पिण्याचा तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटवून हा भाग बारमाही बागायती कसा करता येईल हे पाहावे.