
आमदार रोहित दादा पवार यांच्या काम कार्यपद्धतीवर व विचाराचा पगडा घेऊन आज कोपर्डी येथील बुद्धभूषण तरुण मंडळ कोपर्डी येथील सर्व युवक कार्यकर्त्यांनी यात प्रामुख्याने अमोल शिंदे , भाऊ शिंदे , शरद शिंदे,शिवाजी शिंदे,युवराज शिंदे , शांतीलाल शिंदे , विजित शिंदे , संतोष शिंदे , संदीप शिंदे यांच्या सहशेकडो कार्यकर्त्यांनी बहुमताने निवडून देण्यासाठी जाहीर पाठिंबा दिला असून एक गठ्ठा आम्ही सर्व बहुजन मतदान करू असा शब्द आमदार रोहित दादा पवार यांना दिला.
यावेळेस कोपर्डीचे सरपंच शांतीलाल सुद्रिक ,लक्ष्मण सुद्रिक उपविभाग प्रमुख शिवसेना ( उ.बा.ठा.) उपसरपंच राहुल सुद्रिक , ग्रामपंचायत सदस्य संतोष गांगर्डे , ग्रामपंचायत सदस्य तात्या शिंदे , ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय सुद्रिक , ज्येष्ठ नेते झुंबरकाका सुद्रिक , उद्योजक सनी पठाण,शेतकरी संघटनेचे लाला साहेब सुद्रिक ,अनिल दरेकर युवासेना (उपतालुका प्रमुख ) सुरेश सुद्रिक , युवा नेते काकासाहेब सुद्रिक , मुबारक पठाण ,उपस्थित होते . यावेळी बोलताना आमदार रोहित पवार यांना बुद्धभूषण तरुण मंडळ जास्तीत जास्त मताधिक्य देणार असा निर्धार सर्व भीम सैनिकांनी केला .







