
कुळधरण मधून सर्वाधिक लीड देण्याचा मानस ग्रा.सदस्य शेषराव सुपेकर यांनी व ग्रामस्थांनी निर्धार व्यक्त केला. कुळधरण साठी आ.रोहीत दादा पवार यांनी मोठा निधी दिल्याने गावाचा कायापालट झाला असून राहिलेला विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आ.रोहीत दादा पवार यांना मोठे मत्ताधिक्य देण्याचा मानस यावेळी सर्वांनी व्यक्त केला .यावेळी बोलताना ते म्हणाले , गेल्या पाच वर्षात वाडी वस्ती रस्ते मुरुमीकरण, चिंचेचे लवण येथे अंगणवाडी नवीन बांधकाम , दत्त मंदिर सभा मंडप , जगदंबा देवी सभा मंडप ,मोफत टँकरने पाणीपुरवठा , शालेय साहित्य वाटप , विद्यालयातील विद्यार्थ्यांना सायकल वाटप , शेतकऱ्यांना विहिरी , गायगोठे आदी विकासकामे केली.आ .रोहीत दादा पवार यांनी गेल्या पाच वर्षात प्रत्येक घटकांसाठी काम केले असून युवकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, वृद्धांसाठी केलेले काम खूप प्रशंसनीय असून त्या कामाची पोचपावती म्हणून कर्जत- जामखेड मतदारसंघातील मतदार आ.रोहितदादांना पुन्हा एकदा बहुमताने निवडून देणारच आहेत, याबद्दल कुणाच्याही मनात कोणतीही शंका नाही. आमचा कर्जत – जामखेड मतदारसंघातील सर्व युवावर्ग दादांच्या अंगी असणाऱ्या नेतृत्वगुणांमुळे व पवार साहेबांसारखीच झपाटल्यासारखे न काम करण्याची क्षमता अंगी असल्यामुळे रोहितदादांना भावी मुख्यमंत्री म्हणून पाहू न इच्छितो. येणारे सरकार हे निश्चितच महाविकास आघाडीचे असणार आहे व त्यामध्ये दादांना दादांना मंत्री पद मिळणार असणार आहे याची मतदारसंघातील सर्वांना खात्री आहे आणि त्यामुळे मतदारसंघाचा जो विकास होणार आहे त्याचा झपाटा खुप हा खूप मोठा असणार असून आपल्या विचारांचे सरकार नसताना दादांनी मागील अडीच वर्षात मतदारसंघात जी काही कामे केली आहेत ती विरोधकांना सरकार असतानाही दूरदृष्टी नसल्याने करता आली नाहीत.
आ.रोहीत दादांनी कर्जत जामखेड हा भाग भौगलिकदृष्ट्या कमी पावसाचा भाग असल्यामुळे त्यातच हा ग्रामीण मतदार संघ असल्याने येथील अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असल्याने त्यासाठी जलसंधारण साठी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून भरीव निधी आणून विविध प्रकारचे बंधारे बांधलेच शिवाय या जुन्या बंधाऱ्यांची दुरुस्ती , गेट बसवणे, गाळ काढणे , ओढ्यांचे खोलीकरण , या माध्यमातून पावसाचे पाणी साठवण्याचा आणि ते जमिनीत जिरवण्याचा प्रयत्न केला.
अवर्षणग्रस्त भाग असलेला कर्जत जामखेड मतदारसंघ पाणीदार करण्याचा आ.रोहीत दादा यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे.यासाठी त्यांनी विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून आणि सीएसआरच्या माध्यमातून जलसंधारणाच्या कामासाठी भरीव निधी आणला.
विरोधकांनी मतदारसंघात कामे आणण्याऐवजी दादांनी आणलेली बहुतांश कामे अडवण्यात आणि मतदारसंघाचा विकास अडवण्यातच आपली सर्व शक्ती खर्च घातली. हे सर्व मतदार जाणून आहेत आणि त्याचा रोष ते मतदानातून व्यक्त केल्याशिवाय राहणार नाहीत.
मतदारसंघातील विकासासाठी दादांशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही हे सर्व मतदार राजा जाणून असून आम्ही कर्जत जामखेड मतदारसंघातील सर्व शेतकरी, युवक,विद्यार्थी, महिला, वृद्ध सर्व घटकांनी येणाऱ्या २० नोव्हेंबर रोजीच्या विधानसभा निवडणुकीत दादांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचा निश्चय केला असल्याचे कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.
आ .रोहीत दादा पवार यांनी केलेली विकास कामे व सर्वसामान्य जनता त्यांच्या पाठीशी असल्याने येथील खरा विकास पुत्र म्हणून आमदार रोहित दादा यांच्याकडे सर्व जनता भविष्याचा व्हिजन असणारा नेता अशी आमदार रोहित दादा पवार यांची ख्याती झाली असून शैक्षणिक व आरोग्यामध्ये केलेली मदत यामुळे आमदार रोहीत दादा पवार यांना कुळधरण व परिसरातून सर्वाधिक लीड देऊन निवडून आणणार असल्याचा निर्धार यावेळी सर्वांनी व्यक्त केला .







