
संघर्ष युवा प्रतिष्ठान , बहीरोबावाडी तर्फे आ.रोहीत दादा पवार यांचा जोरदार प्रचार असून आ .रोहीत दादा पवार यांच्यासाठी त्यांनी कंबर कसली असून त्यांनी वेगवेगळ्या भागात आ.रोहीत दादा पवार यांच्या प्रचारार्थ दिवसभर प्रचारात मंडळातील सर्व पदाधिकारी , कार्यकर्ते व्यस्त असून वैयक्तिक जनसंपर्क करून आ.रोहीत दादा पवार यांनी केलेल्या विकासकामांची महती ते पटवून देत आहेत.
यावेळी बोलताना ते म्हणाले , आ रोहीत दादा पवार यांची वाटचाल ही केवळ कर्जत जामखेड मतदार संघापुरती मर्यादित नसून राज्याचे ते थोड्याच दिवसात कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. आ.रोहीत दादा पवार यांची सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तळमळ असल्याचे ते यावेळी सर्वांना सांगत आहेत. विशेषत: ज्या नागरीकांबरोबर ते थेट कनेक्ट आहेत त्या नागरिकांना वैयक्तिक जनसंपर्क करून आ.रोहीत दादा पवार यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या विकासकामांची महती पटवून देत आहेत .आमदार रोहीत दादा यांच्या सर्वसमावेशक आणि विकासात्मक कामाने तालुक्यातील अनेक सर्वसामान्य नागरिक , ग्रामस्थ आ.रोहीत दादा पवार साहेबांचे कौतुक करताना त्यांना दिसत आहेत. युवांच्या , गोरगरीब लोकांच्या भविष्याचा आणि विकासाचा सखोल दृष्टिकोन असल्यामुळे लोक बाजारात , चावडीवर जागोजागी आ.रोहीत दादा यांच्या बद्दल जागोजागी बोलू लागले आहेत.ही निवडणूक कर्जत जामखेड मधील स्वाभिमानी जनतेने हातात घेतल्याने आता फक्त आ.रोहीत दादांचे लीड मोजायचे अशी प्रतिक्रिया यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी दिली.







