
आ.रोहीत पवार यांना पराभव समोर दिसू लागल्याने ते हतबल झाले असून त्यांनी कोणताही गेल्या पाच वर्षात विकास केला नसल्याने त्यांचा पराभव आजच निश्चित असल्याची प्रतिक्रिया अंकुश ठोंबरे व बाळु कायगुडे यांनी केले आहे.
भूमिपुत्र आ.राम शिंदे यांनी सर्वच बाजूने निर्णायक आघाडी घेतल्याने अनेक तालुक्यातील भूमिपुत्रांनी आपल्या हक्काच्या भूमिपुत्र प्रा.राम शिंदे साहेब यांना साथ देत त्यांचे हात बळकट केले आहेत.अनेक सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची साथ सोडत भाजप मध्ये पक्ष प्रवेश केला आहे. पार्सल परत पाठवण्यासाठी या सर्व ज्येष्ठ नेत्यांची साथ भूमिपुत्रासाठी निश्चितच महत्वाची ठरणार आहे . आता फक्त शिंदे साहेबांचे लीड मोजायचे असून पार्सल बारामतीला फिक्स जाणार आहे यात कोणतीही शंका नाही.
आ.पवार यांनी त्यांच्या भाषणात विकासकामांवरती बोलायला पाहिजे परंतु ते विकास कामांवर न बोलता बघून घेतो,अधिकाऱ्यांना दम देत आहेत अशी भाषा त्यांनी वापरल्याने पराभवाच्या भीतीने त्यांचा समतोल ढासळला असल्याचे प्रतिक्रिया त्यांनी दिली.
आ.राम शिंदे साहेब यांच्या शास्वत विकासाला प्रेरित होवून मतदारसंघातील अनेक युवक , कार्यकर्त्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला .त्यामुळे राष्ट्रवादी शरादचंद्र पवार पक्षाचे आ .पवार व कार्यकर्ते बिथरले असून ते आ.शिंदे साहेबांवर बेछूट आरोप करत आहेत.
आ.शिंदे साहेब यांनी विकास कामांना किती निधी दिला आणि आ.पवार यांनी किती निधी दिला यावर समोरासमोर बसून चर्चा करू असे आव्हान दिले ते स्वीकारावे असे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.







