पुढारी गेले तरी सर्वसामान्य जनता आ.रोहीत दादा पवार यांच्या सोबत खंबीरपणे पाठीशी असल्याने दादांचा विजय निश्चित : कैलास श्रीमंत काळे 

0
153
Google search engine

कर्जत जामखेड मतदार संघाच्या विकासासाठी आ.रोहीत दादा पवार यांच्या शिवाय दुसरा पर्याय नसून भविष्यात कर्जत जामखेड मतदारसंघ विकासाच्या रथावर स्वार असेल , मतदार संघाच्या विकासासाठी आ .रोहीत दादा हे आवश्यक असून दादा नामदार होणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तालुक्यातील सर्व पुढारी गेले तरी सर्वसामान्य जनता आ.रोहीत दादा पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याने ते मोठ्या मतांनी विजयी होतील अशी खात्री कैलास श्रीमंत काळे यांनी दिली.

आ. रोहितदादा पवार यांचे नेतृत्व हे सर्वमान्य नेतृत्व असून महाराष्ट्रातील सर्वात जलद गतीने उभरते नेतृत्व असून त्यांचे कार्य हे युवकांसाठी खूप प्रेरणादायी आहे. २०१९ मध्ये ४३ हजार मतांनी निवडून आल्यानंतर आ .रोहित दादांचे फक्त निवडणुकी अगोदर दोन महिने काम होते तरी लोकांनी एवढा विश्वास दाखवला. त्यानंतर त्यांनी पाच वर्षात केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांच्या जोरावर त्याच कामाच्या रूपाने आ.रोहित दादा प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचले व प्रत्येकाचा हृदयामध्ये स्थान निर्माण केले म्हणून दिलसे दादा फिरसे दादा असे म्हणत त्यांनी आ.रोहीत दादा यांचा विजय निश्चित असल्याचे सांगितले.

कर्जत- जामखेडमधील सर्व युवा वर्ग रोहितदादांच्या पाठीशी ठामपणे उभा आहेत. कारण स्वातंत्र्यानंतर जवळजवळ ७२ वर्षांनी मतदारसंघातील सर्व घटकांच्या अडी अडचणीची जाण असणारे नेतृत्व प्रथमच कर्जत जामखेड मतदारसंघास लाभले असल्याचे कैलास काळे यांनी म्हटले आहे.

आ.रोहीत दादांचे नेतृत्व हे सर्वांना सामावून घेणारे असून त्यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे . आ.रोहीत दादांच्या विजयासाठी त्यांचा पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याचा संकल्प करत कार्यकर्तेच डोअर टू डोअर प्रचार करत आ.रोहीत दादा यांची विकासकामे हे मतदार राजाला सांगण्यात येत आहेत .

आमदार रोहित पवार यांनी निवडून आल्यानंतर गेल्या पाच वर्षात मतदारसंघात शास्वत विकास करत रस्ते, पाणी, सिंचन, वीजपुरवठा, आरोग्य, शिक्षण, एसआरपीएफ सेंटर, शासकीय इमारती,अध्यात्मिक विकास अशा प्रत्येक क्षेत्रात भरीव काम केले. याच कामाच्या बळावर ते निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि हीच विकामकामे आमदार रोहित पवार यांना विजयाचा गुलाल लावणार अशी जोरदार चर्चा सध्या गावोगावी, वाडी वस्त्यावर सगळीकडे ग्रामीण भागात ऐकायला मिळत आहे.आमदार रोहित पवार यांच्याकडे विकासाचे व्हिजन असून त्यांची सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी असणारी तळमळ पाहून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात अनेकजण पक्षप्रवेश करत आहेत.

पुढे ते म्हणाले, गेल्या पाच वर्षात प्रत्येक घटकांसाठी काम केले असून युवकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, वृद्धांसाठी केलेले काम खूप प्रशंसनीय असून त्या कामाची पोचपावती म्हणून कर्जत- जामखेड मतदारसंघातील मतदार आ.रोहितदादांना पुन्हा एकदा बहुमताने निवडून देणारच आहेत, याबद्दल कुणाच्याही मनात कोणतीही शंका नाही. आमचा कर्जत – जामखेड मतदारसंघातील सर्व युवावर्ग दादांच्या अंगी असणाऱ्या नेतृत्वगुणांमुळे व पवार साहेबांसारखीच झपाटल्यासारखे न काम करण्याची क्षमता अंगी असल्यामुळे रोहितदादांना भावी मुख्यमंत्री म्हणून पाहू न इच्छितो. येणारे सरकार हे निश्चितच महाविकास आघाडीचे असणार आहे व त्यामध्ये दादांना दादांना मंत्री पद मिळणार असणार आहे याची मतदारसंघातील सर्वांना खात्री आहे आणि त्यामुळे मतदारसंघाचा जो विकास होणार आहे त्याचा झपाटा खुप हा खूप मोठा असणार असून आपल्या विचारांचे सरकार नसताना दादांनी मागील अडीच वर्षात मतदारसंघात जी काही कामे केली आहेत ती विरोधकांना सरकार असतानाही दूरदृष्टी नसल्याने करता आली नाहीत.

आ.रोहीत दादांनी कर्जत जामखेड हा भाग भौगलिकदृष्ट्या कमी पावसाचा भाग असल्यामुळे त्यातच हा ग्रामीण मतदार संघ असल्याने येथील अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असल्याने त्यासाठी जलसंधारण साठी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून भरीव निधी आणून विविध प्रकारचे बंधारे बांधलेच शिवाय या जुन्या बंधाऱ्यांची दुरुस्ती , गेट बसवणे, गाळ काढणे , ओढ्यांचे खोलीकरण , या माध्यमातून पावसाचे पाणी साठवण्याचा आणि ते जमिनीत जिरवण्याचा प्रयत्न केला.

अवर्षणग्रस्त भाग असलेला कर्जत जामखेड मतदारसंघ पाणीदार करण्याचा आ.रोहीत दादा यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे.यासाठी त्यांनी विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून आणि सीएसआरच्या माध्यमातून जलसंधारणाच्या कामासाठी भरीव निधी आणला.

विरोधकांनी मतदारसंघात कामे आणण्याऐवजी दादांनी आणलेली बहुतांश कामे अडवण्यात आणि मतदारसंघाचा विकास अडवण्यातच आपली सर्व शक्ती खर्च घातली. हे सर्व मतदार जाणून आहेत आणि त्याचा रोष ते मतदानातून व्यक्त केल्याशिवाय राहणार नाहीत.

मतदारसंघातील विकासासाठी दादांशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही हे सर्व मतदार राजा जाणून असून आम्ही कर्जत जामखेड मतदारसंघातील सर्व शेतकरी, युवक,विद्यार्थी, महिला, वृद्ध सर्व घटकांनी येणाऱ्या २० नोव्हेंबर रोजीच्या विधानसभा निवडणुकीत दादांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचा निश्चय केला असल्याचे कैलास श्रीमंत काळे यांनी म्हटले आहे.