
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रवादी युवक तालुका उपाध्यक्ष पदी लखन टकले यांची निवड करण्यात आली .आ.रोहित दादा पवार यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष नितीन धांडे , जिल्हा परिषद सदस्य गुलाब काका तनपुरे , तालुका कार्याध्यक्ष सरपंच केशव अडसूळ , सतीश लागोडे , मिरजगाव शहराध्यक्ष तानाजी पिसे , पदाधिकारी , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यांना दिलेल्या निवडपत्रात म्हटले आहे की , पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व देशाचे माजी कृषिमंत्री शरदचंद्र पवार साहेब ,संसदरत्न खा.सुप्रिया सुळे , आ.रोहित दादा पवार यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचावेत व पक्ष वाढी साठी भरीव काम करावे.
यावेळी बोलताना लखन टकले म्हणाले की , आ.रोहित दादा पवार यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला उपाध्यक्ष पदाची संधी दिल्याबद्दल मी त्यांचा कायम ऋणी राहील.येणाऱ्या काळात पक्ष विस्तार , संघटन कौशल्य वाढविणार असून पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.







