
कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी लढाईत आ.राम शिंदे साहेबांचा विजय निश्चित असल्याची खात्री राहुल सरकाळे पाटील , तालुका उपाध्यक्ष युवा मोर्चा यांनी दिली.
चिलवडी मधील सोसायटी मा. चेअरमन विवेक पाटील आणि ग्रा सदस्य सचिन शिंदे यांचा भारतीय जनता पार्टीत आ.राम शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश
झाले त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
कर्जत-जामखेड मतदारसंघात यंदा धनशक्ती विरूध्द (भूमिपुत्र) अशी थेट लढत आहे. यामुळे सर्वसामान्य गोरगरिब जनतेची मोठी ताकद आमदार राम शिंदे यांच्या पाठीशी सर्वसामान्य जनता एकवटली आहे. आमदार प्रा.शिंदे शिंदे यांच्या जनसंवाद पदयात्रेने मतदारसंघाचे चित्रच बदलून गेल्याचे पाहायला मिळाले असून आमदार प्रा.राम शिंदे साहेब यांनी मतदारसंघात केलेल्या शाश्वत विकासावर प्रेरित होऊन मतदारसंघातील शेकडो युवक व जेष्ठ कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने भाजपात प्रवेश करण्याचा जोरदार धडाका लावला आहे. ‘दबाव, दडपशाही, गुंडशाही, हिटलरशाही, हुकुमशाही, विविध प्रलोभने या सर्वांना झुगारून गावागावात रोहित पवारांविरोधात बंड सुरू झाले आहे. पाच वर्षे केलेली जाहिरातबाजी, इव्हेंटबाजी आणि गंडवागंडवीच्या विरोधात जनतेचा उद्रेक उफाळून आला आहे.’
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवारांच्या विजयासाठी ज्यांनी ज्यांनी जीवाचं रान केलं होतं, त्या नेत्यांसह तरूण वर्गाने रोहित पवारांविरोधात एल्गार पकारत आमदार प्रा. राम शिंदे यांच्या विजयासाठी कंबर कसली आहे. रोहित पवारांची साथ सोडत या सर्वांनी भाजपात प्रवेश करण्याचा धडाका लावला आहे.
आ.पवारांविरोधात मोठी लाट सक्रिय झाली आहे. गावागावातील राष्ट्रवादीचे अनेक नेते व कार्यकर्ते आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश करू लागले आहेत. या सर्व घडामोडी पान स्थानिक भूमिपुत्र आमदार राम शिंदे यांची राजकीय ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यंदा मतदारसंघामध्ये स्थानिक कार्यकर्ते व गोरगरीब सर्वसामान्य जनता आमदार राम शिंदे यांच्या पाठीशी मोठ्या प्रमाणात एकवटली आहे. यंदाच्या निवडणुकीत आमदार शिंदेंचे पारडे जड झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपा विजयाचा गुलाल उधळनारच अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली .







