आ.प्रा.राम शिंदे साहेबांना गावडेवाडी रोटेवाडी मधुन लीड देणार : राहुल कांतीलाल गावडे 

0
161
Google search engine

 

कर्जत जामखेडचे भूमिपुत्र माजी मंत्री प्रा.राम शिंदे साहेब हे विक्रमी मतांनी विजयी होणार असून त्यांच्या विजयात हातभार लावण्यासाठी गावडेवाडी रोटेवाडी मधून त्यांना मोठे मत्ताधिक्य देणार असल्याचे राहुल गावडे यांनी ग्वाही दिली .तसेच भारतीय जनता पार्टी , चे पदाधिकारी. आ .शिंदे साहेबांसाच्या विजयासाठी कठोर मेहनत घेत आहेत.

आ.प्रा.राम शिंदे साहेब यांनी जलसंधारण मंत्री असताना व गेली अडीच वर्षात केलेल्या विकासकामांमुळे विकासकामांच्या आधारे बूथ वरून मोठे लीड देणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

आ.राम शिंदे साहेब यांनी गाव अंतर्गत सिमेंट रस्ते , पेव्हीग ब्लॉक ,सभा मंडप ,जलयुक्त शिवार मधून बंधारे दिले.अवर्षणग्रस्त भाग असलेला कर्जत जामखेड मतदारसंघ पाणीदार करण्याचा आ.राम शिंदे साहेब यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे.यासाठी त्यांनी विविध माध्यमातून जलसंधारणाच्या कामासाठी भरीव निधी आणला.जलसंधारणाच्या कामांमध्ये ओढा , नदी खोलीकरण , रुंदीकरण , डीपी कट, तलावातील गाळ काढणे , तलावांचे एकत्रीकरण , डीप सीसीटी आदी कामे केली. पाणी आडवा पाणी जिरवा या योजने अंतर्गत त्यांनी केले.आज जलयुक्त शिवार योजनेमुळे संपूर्ण कर्जत तालुका बागायती तालुका म्हणून ओळखला जावू लागला आहे याचे श्रेय हे आ. प्रा.राम शिंदे साहेब यांना जाते असे त्यांनी यावेळी सांगितले.

शब्द पूर्ण करणारे आमदार अशी कित्येक जणांना प्रचिती असणारे प्रा .आमदार राम शिंदे साहेब हेच विकासपुत्र असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मतदार राजाने आ.प्रा.राम शिंदे साहेब यांच्या नावसमोरील कमळ या चिन्हापुढील बटन दाबून मतदान करून आपल्या गावचा व तालुक्याचा राहिलेला विकासाचा अनुशेष करण्यासाठी प्रा.आ.राम शिंदे यांना भरघोस मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.