
भूमिपुत्र आ.प्रा राम शिंदे साहेब हे सर्वांना सामावून घेणारे नेतृत्व असून त्यांचा विजय निश्चित असल्याची ग्वाही सरपंच किरण पावणे यांनी दिली .
भूमिपुत्र आ.राम शिंदे यांची सर्वच बाजूने निर्णायक आघाडी घेतल्याने अनेक तालुक्यातील भूमिपुत्रांनी आपल्या हक्काच्या भूमिपुत्र प्रा.राम शिंदे साहेब यांना साथ देत त्यांचे हात बळकट केले आहेत.अनेक सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची साथ सोडत भाजप मध्ये पक्ष प्रवेश केला आहे. पार्सल परत पाठवण्यासाठी या सर्व ज्येष्ठ नेत्यांची साथ भूमिपुत्रासाठी निश्चितच महत्वाची ठरणार आहे . आता फक्त आ.शिंदे साहेबांचे लीड मोजायचे असून पार्सल बारामतीला फिक्स जाणार आहे यात कोणतीही शंका नाही असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
यावेळी बोलताना ते म्हणाले की , आमदार प्रा.राम शिंदे यांनी मंत्री पदाच्या काळात जलसंधारणचे काम केल्यामुळे तालुका सुजलाम सुफलाम झाला . आज कर्जत तालुका शेती उत्पादनात अग्रेसर बनला आहे. कर्जत-जामखेडमध्ये होणारी निवडणूक सामान्य नाही. यंदा विरोधकाला असे हरवा की, यापुढेही कोणत्याही बाहेरच्या उमेदवाराला तुमच्या मतदारसंघात येऊन निवडणूक लढवण्याची परत ताकीद झाली नाही पाहिजे. त्यासाठी मोठ्या ताकदीने कामाला लागा, जोश आणि बुध्दीने ही निवडणूक लढवा, कर्जत जामखेडच्या स्वाभिमानासाठी आणि आपल्या मातीतल्या भूमिपुत्राला जिंकून आणण्यासाठी जोमाने कामाला लागा असे आवाहन त्यांनी केले.
आपला तो आपलाच असतो ,स्थानिक नेते , कार्यकर्ते यांच्या स्वप्नांचा आ.रोहित पवार यांनी केलेला भ्रमनिरास यामुळेच आ.राम शिंदे यांना आपला तो आपलाच असतो असे म्हणत सर्व नेत्यांनी एकत्र येत प्रेमळ,शांत,संयमी,असलेल्या प्रा. राम शिंदे यांना साथ दिली पाहिजे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले .
पुढारी कसा असावा या संदर्भात भाष्य करतांना आ.राम शिंदे साहेब नेहमी सांगतात, “पुढारी खराखुरा मार्गदर्शक असावा,
तो स्वार्थी नसावा, सर्वसामान्य माणसांसाठी झटतो, तो खरा नेता असतो.नेत्याजवळ दूर दृष्टिकोण असायला हवा. भविष्याचा अचूक वेध घेण्याची क्षमता त्याच्याजवळ असली हवी.त्याचे चारित्र्य निष्कलंक असायला पाहिजे. नेत्याला वास्तविक सामाजिक भान असणे गरजेचे आहे.
कर्जत-जामखेडचे भुमिपुत्र आ, प्रा राम शिंदेसाहेब यांनी नेहमीच कर्जत जामखेडच्या जनतेला समान न्यायाची भुमिका घेतली आहे.जातीधर्माच राजकारण त्यांच्याकडुन कधीचं केल गेल नाही, कामानिमित्त भेटणाऱ्या व्यक्तीला किंवा अडचणीच्या काळात मदत मागणाऱ्या कुठल्याच व्यक्तीला त्यांनी आजतागायत जातधर्म न विचारता शक्य तेवढी मदत करण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे,
सर्वसामान्य कुटुंबातुन संघर्षातुन स्वबळावर पुढ आलेलं नेतृत्वाला राजकारणात जात नसते हे शिंदेसाहेबांनी त्यांच्या कामातुन अनेकवेळा दाखवुन दिलं आहे,विरोधकांना पराभवाची चाहुल लागल्याने त्यामध्ये मतदारसंघाबाहेरील वेगवेगळ्या समाजाच्या नेत्यांविषयी सहानुभुतीची वक्तव्य करून मतदारसंघात राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत,
आ रोहीत पवार हे कर्जत-जामखेडकरांनी दिलेल्या संधीला आणि विश्वासाला अपात्र ठरल्यामुळे जनतेच्या मनात रोष असल्याचं त्यांच्या लक्षात आलं असल्याने ते आता काहीही करू लागले आहेत.
रोहीत पवारांच्या पाच वर्षाच्या काळात ते अडीच वर्षे सत्तेतही होते.कर्जत-जामखेड मतदारसंघाविषयी खुप काही करण्याची संधी असतानाही त्यांनी सत्तेच्या काळात कोरोनाचे कारण आणि बोगस स्टंटबाज करत आ.प्रा.राम शिंदेसाहेबांवर आरोप करत कसलही विकासकाम मतदारसंघात केले नाही . या सगळ्या गोष्टी आता कर्जत जामखेडच्या जनतेच्या लक्षात आल्यामुळे कर्जत-जामखेडची जनता रोहीत पवार आणि कुटुंबियांपासुन दुर होत असल्यामुळे ते आता हतबल झाले आहेत.
कर्जत-जामखेडचे भुमिपुत्र आ.प्रा.राम शिंदे साहेबांचा विजय निश्चित असल्याच यावेळी बोलताना ते म्हणाले .







