
आज आ.रोहीत दादा पवार यांच्या प्रचाराचा मारुती मंदिर येथे नारळ वाढवून प्रचाराला सुरुवात झाली. यावेळी पदाधिकारी , कार्यकर्ते , सर्व ग्रामस्थ आदींच्या उपस्थितीत नारळ वाढवून प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला
यावेळी बोलताना सर्वांनी आ.रोहीत दादा पवार यांच्या विजयाचा संकल्प करत आ.रोहीत दादांचे नेतृत्व हे सर्व घटकांना सामावून घेणारे असून त्यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे . आ.रोहीत दादांच्या विजयासाठी त्यांचा पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याचा संकल्प करत डोअर टू डोअर प्रचार करत आ.रोहीत दादा यांची विकासकामे हे सर्वसामान्य जनता ,ग्रामस्थ यांना सांगण्यात येणार आहे . आ.रोहीत दादा हेच मतदारसंघाचे भूमिपुत्र असून ते येणाऱ्या मंत्री मंडळात मंत्री म्हणून शपथ घेतील असा निर्धार सर्व ग्रामस्थांनी व्यक्त केला.
सभेची सांगता करण्यात आली .यावेळी युवक कार्यकर्त्यांनी ” राम कृष्ण हरी , वाजवा तुतारी ” , एकच वादा , रोहीत दादा , रोहीत दादा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. यावेळी युवक कार्यकर्ते , पदाधिकारी रवळ गाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .
रवळगाव साठी त्यांनी कोंभळी ते रवळगाव रोड खंडोबा मंदिर सभा मंडप , चिंतामणी सभामंडप ,वायाळ वस्ती येथे सिंगल फेज डीपी, रासकर वस्ती काँक्रिटीकरण , मुस्लिम बांधव दफन भूमी कंपाऊंड , उन्हाळ्यात टॅंकरने मोफत पाणी पुरवठा आदी मोठी कामे दिली. त्यामुळे त्यांना रवळगाव येथून सर्वाधिक मताधिक्य मिळवून देणार असल्याची ग्वाही सर्व ग्रामस्थांनी दिली .







