
भूमिपुत्र आ.राम शिंदे यांची सर्वच बाजूने निर्णायक आघाडी घेतल्याने अनेक तालुक्यातील भूमिपुत्रांनी आपल्या हक्काच्या भूमिपुत्र प्रा.राम शिंदे साहेब यांना साथ देत त्यांचे हात बळकट केले आहेत.अनेक सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची साथ सोडत भाजप मध्ये पक्ष प्रवेश केला आहे. पार्सल परत पाठवण्यासाठी या सर्व ज्येष्ठ नेत्यांची साथ भूमिपुत्रासाठी निश्चितच महत्वाची ठरणार आहे . आता फक्त शिंदे साहेबांचे लीड मोजायचे असून पार्सल बारामतीला फिक्स जाणार आहे यात कोणतीही शंका नाही अशी प्रतिक्रिया युवा कार्यकर्ते विठ्ठल कोरडकर यांनी व्यक्त केली.
पुढारी कसा असावा या संदर्भात भाष्य करतांना आ.राम शिंदे साहेब नेहमी सांगतात, “पुढारी खराखुरा मार्गदर्शक असावा, तो स्वार्थी नसावा, दुस-याच्या ओंजळीने पाणी पिणारा नसावा,
भाडोत्री कामे करणारा नसावा, तो दिशाभूल करणारा नसावा, नकली पुढाऱ्यांची संख्या तुम्ही वाढविता कामा नये.”जो लोकांचे नि:स्वार्थ बुध्दीने काम करतो,सर्वसामान्य माणसांसाठी झटतो, तो खरा नेता असतो.नेत्याजवळ दूर दृष्टिकोण असायला हवा. भविष्याचा अचूक वेध घेण्याची क्षमता त्याच्याजवळ असली हवी.त्याचे चारित्र्य निष्कलंक असायला पाहिजे. नेत्याला वास्तविक सामाजिक भान असणे गरजेचे आहे.
आ.राम शिंदे साहेब हेच कर्जत जामखेड विकासाचे जनक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली.







