जोपर्यंत सांगोल्यामध्ये गणपतराव देशमुख होते तोपर्यंत तेथे कोणाला परत आमदार होता आले नाही त्याप्रमाणे जोपर्यंत रोहित दादा आहेत तो पर्यंत कर्जत जामखेडला पुन्हा दुसरा कोणीही आमदार होऊ शकत नाही  पुढारी गेले तरी सर्वसामान्य जनता आ.रोहीत दादा यांच्या सोबतच : राजेंद्र सुद्रीक , शिंदे

0
308
Google search engine

 

पुढारी गेले तरी सर्वसामान्य जनता आ.रोहीत दादा यांच्या सोबतच : राजेंद्र सुद्रीक , शिंदे

 

२०१९ मध्ये आ.रोहित दादांचे निवडणुकी अगोदर फक्त दोन महिने काम होते तरी लोकांनी एवढा विश्वास दाखवत मोठ्या मतांनी निवडून दिले आता त्यांचे कार्य हे पाच वर्षाचे असून त्यांनी केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांच्या रूपाने आ.रोहित दादा प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचले व प्रत्येकाचा हृदयामध्ये स्थान निर्माण केले म्हणून दिलसे दादा फिरसे दादा असे म्हणत आ.रोहीत दादा पवार यांचा विजय निश्चित असल्याची ग्वाही राजेंद्र सुद्रिक यांनी दिली.

यावेळी ते बोलताना म्हणाले आ.राम शिंदे साहेब मंत्री असताना भाजप सरकारने शासकीय उडीद खरेदी केंद्र चालू केले होते त्यावेळी फक्त भाजपच्या कार्यकर्त्यांना ते उडीद खरेदी केंद्र चालवण्यास दिले होते. त्यावेळी ह्याच भूमिपुत्राच्या कार्यकर्त्यांनी गोरगरीब जनतेकडून ४०० ते ५०० रुपये प्रति क्विंटल प्रमाणे उडीद खराब असल्याचे कारण सांगून उडीद खरेदी करण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याकडून प्रतिक्विंटल चारशे ते पाचशे उडीद खराब असल्याचे कारण सांगून रोख पैसे घेतले होते ते पैसे उडीद केंद्र चालक घेत होते .

आ.रोहीत दादा पवार हे कर्तव्यदक्ष आमदार असून आमच्या कुटुंबातील व्यक्ती साधा आजारी जरी पडला तरी आम्ही रोहित दादांना संपर्क करतो रोहित दादा पुढील योग्य उपचाराची सर्व व्यवस्था करून देतात म्हणून जो आपल्या कामासाठी धावून येईल तोच खरा आपला सध्या दोन्ही तालुक्यातील पुढारी आ .शिंदे साहेबांच्या पाठीमागे असले तरी जनता मात्र रोहित दादांच्या बरोबर आहे रोहित दादांना कुठलेही काम सांगितले तरी ते झाले नाही असे कधीच झाले नाही हा आमचा विश्वास आहे म्हणून विश्वास जुना म्हणून रोहित दादा पुन्हा हे आमचे ब्रीद वाक्य आहे.जोपर्यंत सांगोल्यामध्ये गणपतराव देशमुख होते तोपर्यंत तेथे कोणाला परत आमदार होता आले नाही त्याप्रमाणे जोपर्यंत रोहित दादा आहेत तोपर्यंत कर्जत जामखेडला पुन्हा कोणी आमदार होऊ शकत नाही.

शिंदे साहेबांना शेतकऱ्यांनी विनंती केली होती साहेब दुष्काळ पडला आहे जनावराच्या चारा छावणीची व्यवस्था करा त्यावेळेस याच भूमिपुत्राने उत्तर दिले होते की तुम्ही काही दिवस जनावरे पाहुन्यांकडे नेऊन घाला शेतकऱ्यांबद्दल एवढी उदासीनता असलेला हा कसा भूमिपुत्र होऊ शकतो. ज्याप्रमाणे न्यायालयात कामकाज पुराव्यावरती चालते , भावनेवरती चालत नाही यांच्याकडे एकही विकासाचा मुद्दा नसल्याने भूमिपुत्र हा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यामुळे आपण सुद्धा भावनेवर न जाता विकास कामावर जा आणि रोहित दादांना निवडून द्या असे त्यांनी यावेळी आवाहन केले.

 

आमदार रोहित पवार यांनी निवडून आल्यानंतर गेल्या पाच वर्षात मतदारसंघात रस्ते, पाणी, सिंचन, वीजपुरवठा, आरोग्य, शिक्षण, एसआरपीएफ सेंटर, शासकीय इमारती, अध्यात्मिक विकास अशा प्रत्येक क्षेत्रात भरीव काम केले. याच कामाच्या बळावर ते निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि हीच विकामकामे आमदार रोहित पवार यांना विजयाचा गुलाल उधळनारच अशी जोरदार चर्चा सध्या गावोगावी, वाडी वस्त्यावर सगळीकडे ग्रामीण भागात ऐकायला मिळत आहे.आमदार रोहित पवार यांच्याकडे विकासाचे व्हिजन असून त्यांची सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी असणारी तळमळ पाहून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात अनेकजण पक्षप्रवेश करत आहेत.आ.रोहीत दादा पवार हेच मतदारसंघाचे भूमिपुत्र असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.