मतदान वाढविण्यासाठी जनजागृती

0
113
Google search engine

 

 

कर्जत तालुक्यातील विविध महिला बचत गटातील महिलांना येत्या कालावधीत संपन्न होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये मतदार जनजागृतीतून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी नितीन पाटील , उपविभागीय अधिकारी कर्जत तथा निवडणूक निर्णय अधिकारी , २२७ कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघ यांच्या संकल्पनेतून तसेच गुरु बिराजदार, तहसीलदार कर्जत तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत तालुका स्वीप समितीच्या वतीने महिलांना मतदान करा यासाठी आवाहन करण्यात आले यासाठी ८ ते १९ नोव्हेंबर २०२४ दरम्यान विविध उपक्रम आयोजन करण्यात आले आहे. उत्कृष्ट उपक्रम राबवणाऱ्या गावांना महिला बचत गटांना सन्मानपत्र देण्यात येणार आहे .

आज चांदे बुद्रुक आणि परिसरातील गावांमध्ये जाऊन मतदार जागृती समितीने महिला बचत गटांशी चर्चा करून त्यांना शंभर टक्के मतदान करण्याविषयी प्रबोधन करत, त्यांच्याकडून,” मतदार शपथ ” घेण्यात आली. यावेळी या मोहिमेत स्वीप प्रमुख उज्वला गायकवाड शिक्षण विस्तार अधिकारी, किरण कोल्हे, अंकुश झिंजे, गणेश खराडे आदींनी चांदे बुद्रुक गावात सकाळच्या सत्रात बाजारात, मंडईमध्ये भेट घेत युवकांशी ,ज्येष्ठांशी संवाद साधत, मतदानाविषयी जनजागृती केली. स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदारात मतदानाविषयी जागृती करण्यासाठी ही समिती विविध उपक्रम राबवत असून मतदान करण्याचे प्रमाण कमी न होता मोठ्या संख्येने सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा . याविषयी मतदारांचे प्रबोधन करण्यात आले.